Namo Shetkari 8th Installment List 2026: महाराष्ट्र राज्यातील लाखो शेतकरी बांधव सध्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या ८ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. राज्याच्या कृषी विभागाकडून या हप्त्याबाबत सकारात्मक हालचाली सुरू झाल्या असून, लवकरच ₹२,००० थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.
कृषी विभागाने अर्थ विभागाकडे ८ व्या हप्त्यासाठी आवश्यक निधीची मागणी केली आहे. डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनात या योजनेसाठी आवश्यक पुरवणी मागण्या मंजूर झाल्यामुळे सरकारकडे आता पुरेसा निधी उपलब्ध आहे.
राज्यात सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. मात्र, निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार, ज्या लोककल्याणकारी योजना आधीपासून सुरू आहेत, त्यांचे प्रलंबित हप्ते आचारसंहितेच्या काळातही वितरित करता येतात. त्यामुळे ग्रामीण भागातील निवडणुकांचे मतदान होण्यापूर्वीच सरकार हा हप्ता जमा करण्याच्या तयारीत आहे.
शेतकरी बांधवांनो, हा नियम नीट समजून घ्या. सरकारने आता हप्ता मिळवण्यासाठी ‘ॲग्री स्टॅक’ (Agri Stack) नोंदणी कडक केली आहे.
शेतकरी आपल्या मोबाईलवरून स्वतः किंवा जवळच्या ‘आपले सरकार’ सेवा केंद्र, सीएससी (CSC) सेंटर किंवा महा-ई-सेवा केंद्रात जाऊन आपली ॲग्री स्टॅक नोंदणी पूर्ण करू शकतात. नोंदणी पूर्ण झाल्यावर तुम्हाला एक ‘युनिक फार्मर आयडी’ मिळेल जो तुमच्या आधार कार्डशी लिंक असेल.
तुमचा फार्मर आयडी तयार आहे का? किंवा नमो शेतकरी योजनेचा ७ वा हप्ता तुम्हाला मिळाला होता का? तुमची स्थिती कमेंटमध्ये नक्की सांगा!









