Ladki Bahin Yojana E-KYC List: महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. ज्या महिलांचे हप्ते काही तांत्रिक अडचणींमुळे किंवा त्रुटींमुळे रखडले होते, अशा पात्र भगिनींच्या खात्यात आता ६,००० रुपयांची मोठी रक्कम जमा केली जाणार आहे. हे पैसे नेमके कोणाला मिळणार आणि त्यासाठी काय करावे लागेल, याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.
अनेक महिलांच्या अर्जात काही तांत्रिक चुका होत्या किंवा काही महिलांच्या पतीचे निधन झाल्यामुळे कागदपत्रांची पूर्तता होऊ शकली नव्हती. अशा सर्व भगिनींना आता दिलासा मिळाला आहे.
अंगणवाडी सेविकांच्या कामातील काही अडचणींनंतर राज्य सरकारने आता लाडकी बहीण योजनेचे पोर्टल पुन्हा एकदा सुरू केले आहे. अनेक महिलांची ई-केवायसी (e-KYC) अद्याप बाकी आहे किंवा काहींची चुकली आहे. अशा महिलांना आता पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. केवायसी पूर्ण केल्याशिवाय ही ६,००० रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, हे पैसे १४ तारखेपर्यंत येणे अपेक्षित होते, परंतु काही तांत्रिक कारणांमुळे विलंब झाला आहे. आता ही रक्कम २० फेब्रुवारी २०२६ नंतर कधीही महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे.
जर तुमचे सर्व कागदपत्रे व्यवस्थित असूनही पैसे आले नसतील, तर तुम्हाला एक महत्त्वाचे काम करावे लागेल:
- आपले आधार कार्ड, बँक पासबुक, रेशन कार्ड आणि निर्गम उतारा सोबत घ्या.
- तुमच्या जिल्ह्यातील कलेक्टर ऑफिस (जिल्हाधिकारी कार्यालय) येथील लाडकी बहीण योजनेच्या ‘आवक-जावक’ विभागात जा.
- तिथे आपली समस्या मांडून कागदपत्रे दाखवा. त्यानंतर तुमच्या खात्यावर पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू होईल.









