Ladki Bahin E-KYC Process 2026: महाराष्ट्र सरकारची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना आता नवीन टप्प्यावर पोहोचली आहे. सरकारने या योजनेचा मासिक हप्ता १५०० रुपयांवरून वाढवून २१०० रुपये करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मात्र, ही वाढीव रक्कम खात्यात जमा होण्यासाठी काही तांत्रिक अटींची पूर्तता करणे अनिवार्य आहे. जर तुमचे बँक खाते डीबीटी (DBT) साठी पात्र नसेल, तर तुमचा हप्ता अडकू शकतो.
शासकीय नियमांनुसार, योजनेचे पैसे आता केवळ ‘आधार सीडेड’ (Aadhar Seeded) बँक खात्यातच जमा केले जाणार आहेत. जर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त बँक खाती असतील, तर ज्या खात्याला तुमचे आधार कार्ड सर्वात शेवटी लिंक झाले आहे, त्याच खात्यात पैसे जमा होतील. तुमचे खाते सक्रिय नसेल किंवा आधार लिंक नसेल, तर वाढीव २१०० रुपयांचा लाभ मिळण्यास अडचण येईल.
तुमचे पैसे कोणत्या बँकेत येणार आहेत, हे तुम्ही घरबसल्या केवळ दोन मिनिटांत तपासू शकता:
१. अधिकृत पोर्टल: सर्वप्रथम UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवर (myaadhaar.uidai.gov.in) जा.
२. लॉगिन: तुमचा आधार क्रमांक प्रविष्ट करा आणि मोबाईलवर आलेला ओटीपी (OTP) टाकून लॉगिन करा.
३. Status चेक: होम पेजवरील ‘Bank Seeding Status’ या पर्यायावर क्लिक करा.
४. निकाल: येथे तुम्हाला तुमच्या बँकेचे नाव आणि स्टेटस दिसेल. तुमचे स्टेटस ‘Active’ (हिरव्या रंगात) असणे आवश्यक आहे.
जर तुमचे स्टेटस ‘Inactive’ दिसत असेल, तर घाबरण्याचे कारण नाही. तुम्ही खालील उपाय करू शकता:
काही पात्र महिलांना ज्यांचे मागील हप्ते तांत्रिक कारणांमुळे रखडले होते, त्यांना प्रलंबित रक्कमेसह एकत्रित लाभ मिळण्याची शक्यता आहे. जानेवारी २०२६ च्या हप्त्याचे वाटप सुरू झाले असून, महिलांनी आपले आधार स्टेटस तपासून घेणे गरजेचे आहे.









