Gold Rate Today: ज्योतिषशास्त्रामध्ये सूर्य आणि शनी या दोन ग्रहांच्या युतीला अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. पंचांगानुसार, १५ मार्च २०२६ रोजी ग्रहांचा राजा सूर्य आणि कर्माचा दाता शनी देव हे मीन राशीत एकत्र येत आहेत. तब्बल ३० वर्षांनंतर ही युती मीन राशीत होत असल्याने, याचे पडसाद सर्व राशींवर उमटतील.
जरी सूर्य आणि शनी एकमेकांचे शत्रू मानले जात असले, तरीही ही युती मीन, मिथुन आणि कर्क या तीन राशींच्या लोकांसाठी प्रगतीची दारे उघडणारी ठरणार आहे.
ही युती तुमच्याच राशीच्या लग्नभावात (प्रथम स्थानी) होत आहे, त्यामुळे याचा सर्वात मोठा प्रभाव तुमच्यावर दिसेल.
मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी ही युती ‘कर्म’ स्थानी होत आहे, जी करिअरच्या दृष्टीने अत्यंत फलदायी आहे.
कर्क राशीच्या व्यक्तींच्या ‘भाग्य’ स्थानी ही युती होत आहे, ज्यामुळे नशिबाचा कायापालट होऊ शकतो.
जेव्हा हे दोन ग्रह एकत्र येतात, तेव्हा व्यक्तीला यशासाठी कठोर परिश्रम करावे लागतात. पण एकदा यश मिळाले की ते दीर्घकाळ टिकणारे असते. या काळात अहंकार टाळणे आणि वरिष्ठांशी वाद न घालणे फायद्याचे ठरेल.









