Ladki Bahin Yojana February Installment : महाराष्ट्र राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या नियमावलीत आज सकाळी मोठा बदल केला आहे. नवीन शासन निर्णयानुसार (GR), आता केवळ ई-केवायसी करून चालणार नाही, तर पात्रतेचे निकष अधिक कडक करण्यात आले आहेत. या नवीन नियमांमुळे राज्यातील सुमारे ८६ लाख महिला योजनेतून बाद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ज्या महिलांनी अद्याप नवीन अटींची पूर्तता केलेली नाही, त्यांचे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे थकीत हप्ते देखील धोक्यात आले आहेत.
काल रात्री झालेल्या कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी योजनेचा आढावा घेतला. यामध्ये अनेक श्रीमंत कुटुंबे चुकीच्या पद्धतीने लाभ घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता खालील ४ नवीन नियमांच्या आधारे पात्रतेची पडताळणी केली जाणार आहे:
१. साधनसामुग्रीची अट: पूर्वी केवळ चारचाकी गाडी असलेल्या महिला अपात्र होत्या. मात्र, आता घरातील आर्थिक स्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. ज्यांच्याकडे चैनीच्या वस्तू किंवा महागड्या दुचाकी आहेत, त्यांची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
२. रेशन कार्ड ई-केवायसी: केवळ योजनेची केवायसी करून चालणार नाही, तर रेशन कार्डातील सर्व सदस्यांची रेशन दुकानात जाऊन ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
३. उत्पन्नाचा दाखला २०२६: नवीन वर्ष सुरू झाल्यामुळे, अडीच लाख रुपयांच्या मर्यादेत असलेला उत्पन्नाचा नवीन दाखला सादर करावा लागणार आहे.
४. बँक खाते सक्रियता (Active Status): बँक खात्यात ‘मिनिमम बॅलन्स’ नसलेल्या किंवा व्यवहार बंद असलेल्या महिलांचे डीबीटी (DBT) व्यवहार बँकेकडून नाकारले जात आहेत.
ज्या महिलांचे पैसे तांत्रिक कारणांमुळे रखडले आहेत किंवा ज्यांच्या अर्जात त्रुटी आहेत, त्यांना आता ‘स्थितीदर्शक प्रमाणपत्र किंवा शपथपत्र’ अंगणवाडी सेविकांकडे जमा करावे लागणार आहे. विशेषतः विधवा, परित्यक्ता, अनाथ किंवा ज्यांच्या अर्जात नावाची चूक आहे, अशा महिलांनी खालीलपैकी संबंधित कागदपत्र जमा करणे आवश्यक आहे:
हे कागदपत्र जमा केल्यानंतरच तुमची ई-केवायसी पूर्ण मानली जाईल आणि रखडलेले ₹३,००० (नोव्हेंबर+डिसेंबर) तसेच जानेवारीचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होईल.
ही योजना पुढील ५ वर्षे चालणार असून, दरवर्षी १८,००० रुपये याप्रमाणे एकूण ९०,००० रुपये लाभार्थी महिलांना मिळणार आहेत. जर तुम्ही आता कागदपत्रांची पूर्तता केली नाही, तर हे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. सरकारने ३१ मार्च २०२६ पर्यंतची अंतिम मुदत दिली असली, तरी फेब्रुवारीअखेरचा हप्ता मिळवण्यासाठी त्वरित हालचाल करणे गरजेचे आहे.
१. NPCI मॅपिंग: तुमच्या बँकेत जाऊन खाते आधारशी ‘सीडिंग’ (Seeding) असल्याची खात्री करा.
२. नावातील स्पेलिंग: आधार कार्ड आणि बँक पासबुकवरील नावाचे स्पेलिंग एकसारखेच असावे.
३. शिल्लक रक्कम: बँक खाते कोरे न ठेवता त्यामध्ये किमान शिल्लक ठेवा, जेणेकरून खाते ‘डॉर्मंट’ (Dormant) होणार नाही.









